मुंबई : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या रणजीच्या आठवणी

09 Nov 2017 10:18 AM

रणजी करंडकाच्या इतिहासात सर्वाधिक ४१ विजेतीपदांचा मान मुंबईच्या नावावर आहे. त्याच मुंबईच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. रणजी करंडकात मुंबई हा पाचशे सामने खेळणारा पहिला संघ ठरणार आहे. मुंबई आणि बडोदा संघांत उद्यापासून सुरू होणारा सामना हा मुंबईचा पाचशेवा रणजी सामना आहे. त्यानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं बीकेसीतल्या मैदानात एका खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात मुंबईच्या माजी कर्णधारांचा आणि माजी कसोटीवीरांचा गौरव करण्यात आला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सत्कार हा या सोहळ्याचा सर्वोच्च क्षण ठरला. या सोहळ्याच्या निमित्तानं सचिन तेंडुलकरनं मुंबई क्रिकेटनं आपल्याला शिकवलं याच्या आठवणी जागवल्या. तसंच मुंबईकडून खेळतानाचे अनेक किस्सेही त्यानं रंगवले.  

LATEST VIDEOS

LiveTV