मुंबई : तेव्हा तिजोरी उघडलेली, आता चोरी कशाला?, संदीप देशपांडेंची मास्टरस्ट्रोकवर प्रतिक्रिया

13 Oct 2017 09:18 PM

मुंबई महापालिका निवडणुकांच्या वेळी आम्ही तिजोरी उघडी करुन दिली होती, आता चोरी करायची गरज का पडली ? असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकांच्या वेळी मनसेने दिलेला प्रस्ताव शिवसेनेने स्वीकारला नाही. त्यावेळी तिजोरी उघडी करुन दिली होती, मग आता चोरी करायची गरज का पडली? असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला. शिवसेनेने मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीकाही संदीप देशपांडेंनी केली.

LATEST VIDEOS

LiveTV