मुंबई : सत्तेत आल्यास जीएसटी प्रणाली सोपी आणि सुटसुटीत करणार - संजय निरुपम

06 Nov 2017 11:54 PM

2019 मध्ये सत्तेवर आल्यावर किचकट जीएसटी काढून टाकणार असल्याचं असा निर्णय काँग्रेस कमिटीनं घेतलाय. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सध्या पाच प्रकारचा जीएसटी भाजप सरकारनं लावलाय. तो काढून 15 ते 18 टक्क्यांमधील एकच कर जीएसटी प्रणाली लागू करणार असल्याचं निरुपम यांनी म्हटलंय. हि अगदी सहज आणि सोपी जीएसटी प्रणाली असेल त्यामुळं सर्वसामान्य आणि व्यापाऱ्यांचा फायदा होईल असं निरुपम यांनी म्हटलं.

LATEST VIDEOS

LiveTV