मुंबई : आता विनंती नाही, संघर्ष होणार, फेरीवाल्यांच्या मारहाणीचं संजय निरुपमांकडून समर्थन

29 Oct 2017 12:45 PM

मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी समर्थन केले आहे. “जैसी करनी, वैसी भरनी”, असे म्हणत संजय निरुपम यांनी मनसेला प्रत्युत्तर दिले आहे.

“काय कायदेशीर आणि काय बेकायदेशीर, हे ठरवण्याचा मनसेला अधिकार नाही. ज्यावेळी फेरीवाल्यांना मारहाण होत होती, त्यावेळी पोलीस गप्प बसले होते. यापुढेही फेरीवाले असेच करतील.”, असे संजय निरुपम म्हणाले.

शिवसेनेला संपवण्यासाठी भाजप मनसेला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला.

LATEST VIDEOS

LiveTV