मुंबई : लोकल ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण, एक अटकेत

26 Oct 2017 12:36 PM

विनयभंगाच्या भीतीनं मुलीनं ट्रेनमधून उडी मारल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पीडित मुलगी पायल कांबळे रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सीएसएमटीहून करी रोडला जाणाऱ्या रेल्वेच्या महिलांच्या डब्यात एक तरुण चढला आणि त्यावेळी डब्यात 13 वर्षांची मुलगी एकटीच होती. घाबरुन पायलने अलार्म चेन खेचायला सुरुवात केली. ट्रेन थांबत नसल्याने तिचे प्रयत्न सुरुच होते. युवक तिला शांत बसण्याची वार्निंग देत जवळजवळ जात होता. धीर एकवटून पायल ट्रेनच्या दरवाज्याजवळ गेली. आणि तिनं ट्रेनमधून उडी मारली. यात पायलच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली..

LATEST VIDEOS

LiveTV