मुंबई : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं दीर्घ आजाराने निधन

04 Dec 2017 09:57 PM

बॉलिवूडचा चॉकलेट हिरो अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 79 व्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे शशी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या काही काळापासून शशी कपूर यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली.

LATEST VIDEOS

LiveTV