रायगड : सेना सत्तेतून बाहेर पडल्यास राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही : शरद पवार

07 Nov 2017 09:09 PM

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत भेटायला आले होते. मात्र ते सत्तेत समाधानी असल्याचं जाणवत नाही, असे शरद पवार म्हणाले. शिवाय, उद्या कुणी सत्तेतून पाठिंबा काढला, तरी कुणालाही मदत करण्याची आमची भूमिका नाही, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात 10 दिवसांपूर्वी बैठक झाल्याचं उघड झाल्यानंतर पवारांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. कर्जतमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

LATEST VIDEOS

LiveTV