मुंबई : मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर, नोटीस मिळालेल्या तरुणांची शरद पवारांसोबत बैठक

14 Oct 2017 12:57 PM

सोशल मीडियावर सरकार विरोधात लिहणाऱ्या तरुणांसोबत शरद पवार यांनी चर्चा करणार आहेत. या सर्व तरुणांना सरकारविरोधी लिखाण केल्याप्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. वाय बी चव्हाण प्रतिष्ठानला ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

शरद पवार या 35 तरुणांसोबत चर्चा करणार आहेत. या बैठकीला आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित राहणार आहे.

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने 27 तरुणांना नोटीस पाठवली आहे आहे. फेसबुकवरील ‘देव गायकवाड’ फेक अकाऊंट प्रकरणी नोंद गुन्ह्याच्या तपासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी या नोटिसा आहेत.

LiveTV