मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीचं सत्र न्यायालयात घुमजाव

29 Nov 2017 10:39 AM

शीना बोरा हत्येप्रकरणी पीटर मुखर्जीवर शीनाचं अपहरण आणि हत्या केल्याचा आरोप करणा-या इंद्राणी मुखर्जीनं सत्र न्यायालयात घुमजाव केलय. आपल्याला कुणावरही आरोप करायचे नाहीत अशी भुमिका आता इंद्राणीनं घेतलीय. काही दिवसांपूर्वी इंद्राणीनं कोर्टाला दिलेल्या एका अर्जात आपला दुसरा पती पीटर मुखर्जीचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली होती. पीटरनंच त्याचा ड्रायव्हर श्यामवर रायच्या मदतीनं शीनाचं अपहरण करून तिची हत्या केल्याचा गौप्यस्फोट इंद्राणीनं अर्जात केला होता. जर आरोप करायचे नसतील तर अर्ज मागे घ्या अथवा कोर्टानं हा अर्ज रद्द करावा अशी मागणी पीटरच्यावतीनं करताच अर्ज मागे घेणार नाही पण आरोप मागे घेत असल्याचं इंद्राणीच्या वकिलांनी म्हटलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV