मुंबई : राणेंचा मंत्रिमंडळ समावेशाला शिवसेनेचा खोडा, पवार-मुख्यमंत्री भेटीनं चर्चांना उधाण

30 Oct 2017 12:33 PM

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला शिवसेनेने खोडा घातल्याची बातमी माझाच्या सूत्रांनी दिली आहे. नेमक्या त्याच मुहूर्तावर मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये बंददाराआड तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
नवा पक्ष स्थापन करुन एनडीएला पाठिंबा दिलेल्या राणेंना मंत्रिमंडळात सामावून घ्यायचं कसं असा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर पडला आहे. कारण राणेंना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शिवसेनेला गंभीर विचार करावा लागेल, असा उद्धव ठाकरेंचा निरोप मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
ही घडामोड सुरु असतानाच आज सकाळी मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची सुमारे अर्धा तास बैठक झाली. त्यामुळे याच पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी ही बैठक होती का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV