मुंबई : नोंदणीकृत फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ शिवसेनाप्रणित संघटना मैदानात

12 Nov 2017 07:30 PM

गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मोठं रणकंदन सुरु आहे. मात्र या मुद्द्यावर शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात होती. किंबहुना, शिवसेना भूमिका घेण्यास टाळाटाळ करत होती. मात्र आता शिवसेना अप्रत्यक्षपणे फेरीवाल्यांच्या बाजूने लढण्याससरसावली आहे.

शिवसेनेशी संलग्न असलेल्या ‘मुंबई फेरीवाला सेना’ या संघटनेनं फेरीवाल्यांच्या बाजूने लढा देण्यासाठी मुंबईभर मोठी तयारी सुरु केली आहे. यासाठी  शिवसेनाप्रणित मुंबई फेरीवाला सेना या संघटनेची नियोजन बैठक गोरेगाव येथे पार पडली.

या बैठकीत  फेरीवाल्यांवर सध्या होत असणारी कारवाई थांबवून फेरीवाल्यांना तातडीनं पर्यायी जागा द्याव्यात, ही मुख्य मागणी मांडण्यात आली.

LATEST VIDEOS

LiveTV