मुंबई : फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन शिवसेना-मनसे आमनेसामने

13 Nov 2017 08:54 PM

फेरीवाल्यांवरुन मनसे-काँग्रेस आमनेसामने आल्यानंतर आता मनसे आणि शिवसेनेचा सामना पाहायला मिळतोय..शिवसेना अधिकृत फेरीवाल्यांच्या पाठीशी असल्याचं सांगत पहिल्यांदाच शिवसेनेनं आपलं मौन सोडलंय..परवानगी असणाऱ्या फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार असल्याचं राऊत यांनी म्हटलंय...ते मनमाडमध्ये बोलत होते...तर हप्ता बंद झाल्यानं शिवसेना फेरीवाल्यांची बाजू घेत असल्याचा आरोप मनसेनं केलाय...25 वर्ष सत्तेत असूनही शिवसेनेनं अधिकृत-अनधिकृत समस्या सोडवली नसल्याचं मनसेनं म्हटलंय...
एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मनसे फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झालेली पाहायला मिळाली..

LATEST VIDEOS

LiveTV