मुंबई : अंगारकीनिमित्त सिद्धिविनायकाची पूजा रात्री 12 वाजता एबीपी माझावर

06 Nov 2017 09:57 PM

उद्या अंगारकी चतुर्थी. अंगारकीच्या निमित्तानं मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाची पूजा ‘एबीपी माझा’च्या प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच ‘माझा’च्या प्रेक्षकांना ही पूजा घरबसल्या लाईव्ह पाहण्याची संधी मिळणार आहे.

आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत सिद्धिविनायकाची पूजा होणार आहे. ही संपूर्ण पूजा सलग पाच तास ‘माझा’वर भक्तांना पाहता येणार आहे. पहिल्यांदाच घरबसल्या सिद्धिविनायकाची पूजा पाहण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV