माझा विशेष : बदलापूरच्या अक्षय कांबळेचं काय झालं?

27 Dec 2017 11:39 PM

बदलापूरचा अक्षय कांबळे गेल्या महिनाभरापासून आयआयटी कानपूरमधून बेपत्ता आहे. याविरोधात आता दलित संघटना, छात्रभारती विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. अक्षय कांबळेवर रॅगिंग होत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. अक्षय कांबळेला त्याच्या राहणीमानावरुन, दिसण्यावरुन चिडवलं जायचं, असा आरोप अक्षयच्या कुटूंबियानी सुद्धा सांगितलं. 29 नोव्हेंबरला कॉलेजला सुट्ट्या लागल्यानंतर घरी परतण्यासाठी निघालेला अक्षय अद्याप परतलात नाही. कानपूर पोलिस तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप अक्षयच्या कुटुंबानं केला होता. पोलिसांनी नव्यानं तपास करण्याचे आदेश दिले होते. अक्षयचं सिमकार्ड, मोबाईल आणि एटीएम कार्ड त्याच्याच हॉस्टेलमधले विद्यार्थी आणि सफाई कामगारांकडे सापडलं होतं. मात्र महिना होत आला अद्याप पोलिसांना कुठलेही धागेदोरे सापडले नसल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होतो आहे. यानिमित्त अक्षयच्या कुटुंबियांशी खास बातचीत

LATEST VIDEOS

LiveTV