मुंबई : लवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार, राणेंना मंत्रिपद मिळणार?

27 Oct 2017 11:33 AM

हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यामध्ये काही अकार्यक्षमंत्र्यांना नारळ दिला जाण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य सरकारला येत्या 31 ऑक्टोबरला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सविस्तर मुलाखत दिली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माहिती दिली. मंत्रिमंडळ विस्तारात  स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाची स्थापन करुन एनडीएत डेरेदाखल झालेल्या नारायण राणेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

LATEST VIDEOS

LiveTV