मुंबई : निकाल लागेपर्यंत जाणार नाही, मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन

09 Nov 2017 09:51 PM

मुंबई विद्यापीठाच्या महात्मा फुले परीक्षा भवनाबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. अद्यापही 22 हजार विद्यार्थ्यांचे निकाल रखडल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. जोपर्यंत निकाल देणार नाही तोपर्यंत जागेवरुन न हटण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. विद्यापीठाचे निकाल लावा अन्यथा सत्र परीक्षा पुढे ढकला, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. यावेळी विद्यार्थी आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्कीही झाल्याचं पाहायला मिळालं.

LATEST VIDEOS

LiveTV