मुंबई विद्यापीठाबाहेरील विद्यार्थी आणि पालकांचं उपोषण मागे

11 Oct 2017 08:33 PM

मुंबई विद्यापीठाच्या निकाल घोटाळ्याप्रकरणी आज पालक आणि विद्यार्थ्यांनी उपोषण मागे केलंय उपोषणाला बसले होते. जोपर्यंत निकाल जाहीर केला जात नाही तोवर उपोषण मागे घेणार नाही असा इशार पालकांनी दिला होता. मात्र येत्या 6 दिवसात सर्वच निकाल लागतील असं आश्वासन मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुळेंनी दिलं. यानंतर विद्यार्थी आणि पालकांनी उपोषण मागे घेतलं.
ऑक्टोंबरचा दुसरा आठवडा उजाडला तरी दोन हजार तीनशे विद्यार्थ्यांच्या निकालाचा पत्ता नाही. शिवाय प्रथम सत्र परीक्षाचे वेळापत्रक जाहीर झालेले असताना मागील सत्राचा निकाल लागला नाही. त्यामुळे या सगळ्या गोंधळाचा मानसिक ताण अनेक विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालक आक्रमक झाले होते.

LATEST VIDEOS

LiveTV