एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांच्याकडून 7 हजार कोटी रुपये समाजसेवेसाठी दान

23 Nov 2017 09:00 PM

टेलिकॉम क्षेत्रातील जायंट मानल्या जाणाऱ्या ‘एअरटेल’ कंपनीचे चेअरमन सुनील मित्तल यांनी आपल्या खऱ्याखुऱ्या ‘श्रीमंती’चं दर्शन घडवलं आहे. आपल्या एकूण संपत्तीतील 10 टक्के भाग म्हणजे तब्बल 7 हजार कोटी रुपये सामाजिक कामांसाठी दान करण्याची घोषणा केली आहे. भारती फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कामं केली जातात.

उद्योगपती सुनील मित्तल हे केवळ 7 हजार कोटींची संपत्ती समाजसेवेसाठी दान करुनच थांबले नाही, तर त्यांनी ‘एअरटेल’ कंपनीतील आपले 3 टक्के शेअर्सही सामाजिक कामांच्या खर्चासाठी देऊन टाकले.

LATEST VIDEOS

LiveTV