काँग्रेस आणि संजय निरुपमांना अनधिकृत फेरीवाल्यांचा पुळका का? मुंबईकरांचा संतप्त सवाल

30 Oct 2017 11:09 AM

काँग्रेसला प्रवाशांपेक्षा फेरीवाल्यांचा पुळका का आला आहे? असा संतप्त सवाल मुंबईकरांनी केला आहे. इतकंच नव्हे तर संजय निरुपम यांचा फेरीवाल्यांना असलेला पाठिंबा म्हणजे एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतांचा अपमान असल्याचीही भावनाही व्यक्त केली.

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर राज ठाकरेंनी स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर मालाडमध्ये फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्या हल्ल्याचं समर्थन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं. विशेष म्हणजे कालच एल्फिन्स्टन दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाला.

LATEST VIDEOS

LiveTV