मुंबई : माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांना धमक्या

23 Nov 2017 11:24 PM

लोकमान्य टिळक टर्मिनसवर उत्तर भारतीय प्रवाशांकडून रेल्वे पोलिस कशाप्रकार पैसे उकळतात याचा व्हिडिओ एबीपी माझाने समोर आणला होता. त्यानंतर संबंधित दोन पोलिस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलं. मात्र, हा प्रकार एबीपी माझ्याच्या साथीनं ज्या आरटीआय कार्यकर्ते अजय बोस यांनी समोर आणला होता. बोस यांना आता धमक्या येत आहेत. यासंदर्भात त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. दरम्यान, अद्यापही पैसे उकळण्याचा प्रकार सुरुच असल्याची माहिती त्यांनी दिलीय. आपणास सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात यावी, तसच पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी बोस यांनी केलीय.

LATEST VIDEOS

LiveTV