मुंबई : मोदींनी कौतुक केलेले स्वच्छतादूत अफरोज शाहना गुंडांची धमकी, स्वच्छता अभियान थांबवलं

20 Nov 2017 12:12 PM

मुंबईतल्या वर्सोवा बिचवर दर रविवारी स्वच्छता अभियान राबविणारे स्वच्छता दूत अफरोज शाह यांना गुंडांनी धमकवल्याचं समोर येतंय.
त्यामुळे वैतागलेल्या शाह यांनी स्वच्छता मोहीम थांबविण्याचा निर्णय घेतलाय. यासंदर्भात त्यांनी ट्विटकरुन माहिती दिलीय.
अफरोज शाह गेल्या 109 आठवड्यापासून मुंबईथल्या वर्सोवा बिचवर स्वच्छता मोहीम राबवतात. मात्र त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना काही गुंडांकडून धमकावलं जातंय. याशिवाय महापालिकेडून कचराही उचलला जात नाही. गोळा केलेला कचरा तसाच पडून राहतो. या सगळ्यांना कंटाळून त्यांनी ही स्वच्छा मोहीम थांबवली आहे.
खरं तर शाह यांच्या स्वच्छा मोहिमेचं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतूक केलंय. पण पालिकेचा ढिसाळ कारभार आणि गुंडांच्या धमकीमुळे त्यांना ही मोहीम थांबवावी लागतेय.

LATEST VIDEOS

LiveTV