कमला मिल्स कंपाऊंड आग : आत्याला वाचवताना दोन चुलत भावांसह तिघांचा मृत्यू

29 Dec 2017 06:15 PM

ONE ABOVE मध्ये लागलेल्या अग्नितांडवात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. धैर्या ललानी आणि विश्वा ललानी या चुलत भावांचा कमला मिल आगीत मृत्यू झाला. तर त्यांची आत्या प्रमिला केणीया यांचाही मृत्यू झाला. धैर्य काही दिवसांपूर्वी नातेवाईकांकडे अमेरिकेतून मुंबईला आला होता तर विश्व 1 वर्षपासून मुंबईत राहतो. आपल्या मित्राच्या पार्टीसाठी हे तिघे वन अबव्ह रेस्टरन्टमध्ये हे दोघे आले होते. मात्र, अचानक आग लागली. जेव्हा आग वाढायला लागली तेंव्हा त्यांची आत्या प्रमिला केनिया ही रेस्टरन्टच्या वॉशरुम मध्ये अडकली होती. धैर्य आणि विश्वा आगीतून बाहेर पडलेले असताना ह्या दोघांनी आत्याला वाचविण्यासाठी परत रेस्टरन्टमध्ये प्रवेश केला. मात्र आग वाढल्यानं तिघांचाही जीव गेला.

LATEST VIDEOS

LiveTV