मुंबई : टोईंगवेळी कारमधील 'त्या' महिलेकडे बाळ नव्हतं?

13 Nov 2017 12:12 AM

मालाडमध्ये स्तनपान करणाऱ्या महिलेची गाडी टो करुन नेणाऱ्या पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात टोईंगवेळी महिलेकडे तिचं बाळ नसल्याचं स्पष्ट दिसतं आहे. दरम्यान शनिवारी व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर वाहतूक पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे.

या नव्या व्हिडिओत टोईंगवेळी महिला कारमध्ये दिसत आहे, तर तिचं बाळ कारबाहेर असलेल्या तिच्या पतीच्या हातात दिसत आहे. पतीनं पोलिसांसोबत हुज्जत घातल्याचंही या दुसऱ्या व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर त्यानं हे बाळ महिलेच्या हातात दिलं. त्यामुळे या प्रकारात पोलिसांची चूक आहे की कारचालकाचा कांगावा हा प्रश्न उपस्थित होत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV