मुंबई : मेट्रो 3 च्या कामाची उद्धव ठाकरेंकडून पाहणी, सेनेचे मंत्रीही उपस्थित

11 Oct 2017 06:00 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या मेट्रो तीनच्या कामाची पाहणी केली. आझाद मैदानावर उद्धव ठाकरेंसह गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, आरोग्य मंत्री दिपक सावंत, विजय शिवतारे, खासदार अनिल देसाई, मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर उपस्थित होते.
स्थानिक रहिवाशांचं पुनर्वसन आणि आरे कॉलनीतील पर्यावरणच्या प्रश्नांवर शिवसेनेनं यापूर्वीच विरोध केला आहे. त्यामुळेच राज्य सरकारनं नगरविकास खात्याकडून प्रस्ताव आणला आणि आता मेट्रोच्या कामासाठी महापालिकेच्या परवानगीचीही गरज लागणार नाही. त्यामुळे मेट्रो प्रकल्पावर शिवसेनेचे हात बांधले गेले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV