मुंबई : निकालासाठी विद्यार्थिनीच्या फेऱ्या, विद्यापीठाचा गोंधळ कायम

15 Dec 2017 08:48 AM

मुंबई विद्यापीठाचा जगजाहीर झालेला निकालाचा गोंधळ परीक्षेच्या सहा महिन्यांनंतरही सुरु आहे. विद्यापीठाच्या बीएच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिलेली विद्यार्थिनी मीनाक्षी पाटील अजूनही आपल्या निकालासाठी विद्यापीठात फेऱ्या मारत आहे. आत्तापर्यंत प्रत्येक सत्रात फर्स्ट क्लास मिळवलेल्या मीनाक्षीला शेवटच्या परीक्षेत नापास करण्यात आलं आहे. एकदा नाही तर पुनर्मूल्यांकन करुनही तब्बल तीनदा तिला नापास करण्यात आलं आहे. हा सगळा प्रकार मागच्या तीन महिन्यापासून सुरु आहे, दरम्यानच्या काळात मीनाक्षी डीएडची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. मात्र, निकाल राखडल्याने तीचं वर्ष वाया गेलं. युवसेनेने या विद्यार्थिनीच्या समस्येबाबत विद्यापीठाला जाब विचारला. मात्र याबाबत विद्यापीठ मात्र बोलायला तयार नाहीय.

LATEST VIDEOS

LiveTV