मुंबई : विद्यापीठाच्या परीक्षा नियोजित वेळेतच होणार

05 Dec 2017 11:24 AM

मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा नियोजित वेळेनुसार होणार असल्याचं परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अर्जुन घाटूळे यांनी सांगितलं. ऑनलाईन पेपर तपासणीच्या घोळानंतर विद्यार्थ्य़ांना बरीच वाट पहावी लागली. त्यानंतर पुढील अभ्यासक्रमाच्या परीक्षेची वेळ आली तरी अद्याप घोळ संपलेला नाही. त्यामुळे विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थी संभ्रमात होते. परीक्षा कधी होणार हा प्रश्न त्यांना सतावत होता. मात्र, आता परीक्षा नियोजित वेळेत होणार असल्याचं विद्यापीठाने स्पष्ट केलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV