मुंबई : एलफिन्स्टन दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मयुरेशच्या कुटुंबियांना वडापाव विकून 84 हजारांची मदत

15 Oct 2017 09:09 AM

एल्फिन्स्टन पुलावरच्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या मयुरेश हळदणकरच्या कुटुंबियांना वडापाव विकून आज 84 हजार रुपयांची मदत देण्यात आली. परळमधले वडा-पाव विक्रेते मंगेश अहिवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या 5 रुपयांमध्ये वडापाव विकायला सुरुवात केली. सकाळी 10 वाजल्यापासून या उपक्रमाला सुरुवात झाली. रात्री 8 वाजेपर्यंत हा उपक्रम सुरु होता. या उपक्रमाला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद लाभला. या उपक्रमातून मिळालेली 84 हजार रुपयांची रक्कम मयुरेशच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आली. तर दुसरीकडं मराठवाडा मित्र परिवार नवी मुंबईच्या युवकांनी व्हॉट्स अप ग्रुपच्या माध्यमातून हळदणकर कुटुंबियांना 76 हजार रुपयांची मदत केली.

LiveTV