मुंबई : विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 7 डिसेंबरला मतदान, राणेंच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

22 Nov 2017 03:39 PM


विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 7 डिसेंबरला निवडणूक होणार आहेत. त्यात नारायण राणेंच्या उमेदवारीबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. मात्र आता भाजपनं आपल्या उमेदवारांसाठी चाचपणी सुरु केलीय. त्यात भाजपचे मुख्य प्रवक्ते, माधव भंडारी, शायना एनसी आणि प्रसाद लाड यांच्या नावाची चर्चा सुरु झालीय. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपचा उमेदवार निवडून येणं कठीण आहे. आणि राणेंना शिवसेनेचा विरोध आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप राणेंऐवजी इतरांना उमेदवारी देऊ शकतं. आणि पुढच्या काळातील पोटनिवडणुकीत राणेंना विधानपरिषदेत पाठवलं जाऊ शकतं. पण त्यामुळे राणेंचा मंत्रिमंडळातील प्रवेशही लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LATEST VIDEOS

LiveTV