खेळ माझा : आर. अश्विनच्या फिरकी आक्रमणाला आता लेग स्पिनची धार

28 Dec 2017 08:00 PM

टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विननं आता आपल्या भात्यात लेग स्पिनचं अस्त्रही सामील करून घेतल्याची बातमी आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्याआधी अश्विननं नेट्समध्ये लेग स्पिनचा तासनतास सराव केल्याची माहिती सूत्रांनी दिली. विराट कोहलीची टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्याकडे एक मोठं आव्हान म्हणून पाहत आहे. त्यामुळं भारतीय संघातल्या प्रत्येक शिलेदारानं या दौऱ्यासाठी कसून सराव केला. साहजिकच त्याच्या आक्रमणाची धार आणखी वाढली आहे. चेन्नईतल्या एका स्थानिक सामन्यात अश्विननं 9  पैकी 6 षटकं लेग स्पिन टाकून दोन बळी घेतले.

LATEST VIDEOS

LiveTV