मुंबई : सत्तेत राहायचं की नाही?, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट

07 Nov 2017 09:24 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १० दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. खुद्द शरद पवार यांनीच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे भाजपला शह देण्यासाठी आता शिवसेनेनं नवी चाल खेळली आहे.

राज्यातील सत्तेत राहायचं की नाही याबाबत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी चर्चा झाल्याचं खात्रीलायक वृत्त समजतं आहे. या वृत्तामुळे राजकीय वातावरण नक्कीच ढवळून निघणार आहे.

नारायण राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश यावरुन शिवसेनेनं भाजपविरोधी धार वाढवली आहे. राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश होऊ नये यासाठी शिवसेनेनं बरेच प्रयत्न केले होते. पण मुख्यमंत्री राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर ठाम आहेत. त्यामुळे आता शिवसेनेनं थेट शरद पवारांची भेट घेऊन भाजपला धक्का देण्याची तयारी सुरु केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV