मुंबई : चेंबूरमध्ये अंगावर झाड कोसळल्याने महिलेचा मृत्यू

07 Dec 2017 03:03 PM

मुंबईतील चेंबूरमध्ये झाड अंगावर कोसळून आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शारदा घोडेस्वार असं मृत्यू महिलेचं नाव आहे. आज सकाळी 10 च्या सुमारास कामाला जाण्यासाठी शारदा घोडेस्वार डायमंड गार्डन परिसरातील स्टॉपवर बसची वाट पाहत उभ्या होत्या. मात्र त्याचवेळी अचानक झाड अंगावर पडून शारदा यांचा जागीच मृत्यू झाला.

LATEST VIDEOS

LiveTV