मुंबई : मुलुंडमध्ये उघड्या मॅनहोलमध्ये पडून महिला गंभीर जखमी

23 Nov 2017 08:48 AM

मुंबईतले मॅनहोल धोकादायक बनत चालले आहेत. कारण मुलुंडमधील एका उघड्या मॅनहोलमध्ये पडलेली महिला थोडक्यात बचावलीय. भक्तीमार्गावरुन नीलिमा पुराणिक या मॉर्निंग वॉल्कसाठी निघाल्या होत्या. त्यावेळी चालता चालता उघड्या मॅनहोलमध्ये त्य़ा अचानक पडल्या. स्थानिकांनी नीलिमा यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र मॅनहोल खोल असल्यानं अडचण येत होती.. अखेर अग्निशमनदलाच्या मदतीनं नीलिमा यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. मात्र या दुर्घटनेत नीलिमा या गंभीर जखमी झाल्या आहेत. 

LATEST VIDEOS

LiveTV