मुंबई : झवेरी बाझारमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, 4 मृत्यूमुखी

16 Dec 2017 09:48 AM

मुंबईतील झवेरी बाजारमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील सर्वात जुना परिसर म्हणून झवेरी बाजारची ओळख आहे. चिप्पी नावाच्या पाच मजली इमारतीचा स्लॅब काल (15 डिसेंबर) दुपारी अचानक कोसळला. या दुर्घटनेत चार जणांना आपले प्राण गमवावे लागले. अतिशय जुन्या असलेल्या या इमारतीचे म्हाडामार्फत पुनर्बांधणीचे कामही सुरु होतं.

LiveTV