चारशे वर्षांनी शापमुक्ती, वाडियार राजघराण्यात पाळणा हलला

08 Dec 2017 10:33 PM

म्हैसूरच्या वाडियार राजघराण्यात राजपुत्राच्या जन्मामुळे आनंदाचं वातावरणं आहे. तब्बल चारशे वर्षांनंतर या राजघराण्यात पाळणा हलला. त्यामुळे वाडियार राजघराण्याची शापातून मुक्तता झाल्याचं म्हटलं जात आहे. राजा यदुवीर आणि त्रिशिका यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला.

म्हैसूर राजघराण्यात कधीही मुलाचा जन्म होणार नाही आणि हा राजवंश नष्ट होईल, असा शाप या घराण्याला मिळाल्याची आख्यायिका आहे. त्रिशिका यांच्या पोटी जन्मलेल्या बाळामुळे राजघराण्यात आनंदी आनंद आहे.

LATEST VIDEOS

LiveTV