नागपूर : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची हत्या

01 Nov 2017 12:36 PM

नागपुरात काल रात्री दोन वेगवेगळ्या घटनामध्ये दोघांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. पहली घटना वाडी पोलिस स्टेशन अंतर्गत वडधामना परिसरात घडली. अजय रामटेके (28 वर्ष) ची अज्ञात आरोपींनी तलवारीने गळा चिरुन हत्या केली.

तर दूसऱ्या घटनेत जरीपटका पोलिस स्टेशनअंतर्गत बाजारात मंगळवारी मध्यरात्री समीर सलाम शाह (20 वर्ष) हा तरुण मित्रासह बाजारात बसला असताना 3 ते 4 अज्ञात आरोपीनी हल्ला करून जखमी केलं. आज पहाटे रुग्णालयात समीरचा मृत्यू झाला.

LATEST VIDEOS

LiveTV