नागपूर : दोन दिवसात तीन हत्या, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे

24 Nov 2017 10:42 AM

दोन दिवसात झालेल्या तिसऱ्या हत्येनं नागपूरात खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांची 1 कोटीच्या खंडणीसाठी दोन दिवसांपूर्वी हत्या झाली. त्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह हाती लागल्यानं ही बाब उघड झाली.
तर काल संध्याकाळी दिनेश उईकेची स्वावलंबीनगरमध्ये हत्या झाली. दिनेश रस्त्यावर दारु पित होता, यावेळी त्याचा दिनेश कोटांगलेशी त्याचा वाद झाला. यातून कोटांगलेनं दिनेश उईकेच्या डोक्यात दगड घातला. तिसऱ्या घटनेत काल रात्री 9 वाजता अविनाश मेहराची त्याच्या मेव्हण्यानं डोक्यात लाकूड घालून हत्या केली. गोवा कॉलनीत हा प्रकार घडलाय. बहिणीला मारहाण केल्याच्या रागातून मेव्हण्यानं अविनाशला संपवलंय.

LATEST VIDEOS

LiveTV