नागपूर अधिवेशन : कर्जमाफी आणि लाभार्थीच्या जाहिरातींवरुन विरोधक आक्रमक

11 Dec 2017 10:24 PM

आघाडी सरकारनं १५ वर्षात काय केलं, हे विचारत बसण्यापेक्षा तुम्ही मागच्या ३ वर्षात काय केलं, याचा हिशेब द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी केली.

हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. अधिवेशन सुरु होण्याआधीच कर्जमाफीसह अनेक मुद्द्यांवरुन विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी घोषणा दिल्या.

कर्जमाफीबाबत बँकेत शहानिशा केल्यावर शेतकऱ्यांची फक्त नावं आली आहेत., मात्र अजूनही पैसे जमा झालेले नाहीत., असं सांगण्यात आल्याचा दावाही यावेळी अजित पवार यांनी केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV