नागपूर : अश्विनी बिद्रेंची हत्या झाल्याचा संशय, अजित पवारांच्या प्रश्नानंतर मुख्यमंत्र्यांचा संशय

23 Dec 2017 08:54 AM

कळंबोलीतील बेपत्ता पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्याविषयाचा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. राज्याचं गृहखातं मुख्यमंत्र्यांकडे असताना पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश का येत नाही, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पोलीस तपासाचा आधार घेत अश्विनी बिद्रे यांच्या जीवाचं काहीतरी बरंवाईट झालं असावं असा संशय व्यक्त केला.

LiveTV