नागपूर : ..तर मी हिंदू धर्माचा त्याग करेन.! मायावतींचा सूचक इशारा

10 Dec 2017 09:36 PM

जर भाजपने दलित आणि इतर वर्गांचं शोषण थांबवलं नाही, तसंच हिंदू धर्मातील वाईट रीती थांबवल्या नाहीत तर आपण आपल्या करोडो अनुयायांसोबत हिंदू धर्माचा त्याग करु असा सूचक इशारा बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी दिला आहे. आज नागपुरात मायावती यांनी महाराष्ट्र प्रदेशासाठी विराट कार्यकर्ता संमेलन घेतले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

गेल्या काही वर्षांपासून आपल्या पक्षाला कमकुवत केलं जात आहे, असाही आरोप मायावतींनी  संमेलनात बोलताना केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही धर्म बदलू असा इशारा आधी दिला होता. मात्र समाजात बदल झाला नाही आणि म्हणून त्यांनी हिंदू धर्म त्यागला, असेही मायावतीनी म्हटलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV