माझा इम्पॅक्ट : नागपूर : पोलिसांना निकृष्ट जेवण देणाऱ्या केटररची हकालपट्टी

11 Dec 2017 11:18 PM

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसांनी निकृष्ट जेवण देणाऱ्या केटररची हकालपट्टी करण्यात आली आहे. एबीपी माझाने याबाबतचं वृत्त देताच नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांनी वृत्ताची गंभीर देखल घेत कारवाई केली.

नागपुरात बंदोबस्तात तैनात 5 हजार पोलिसांना जेवण देण्यासाठी एकूण 5 केटरर नेमण्यात आले आहेत. त्यापैकी श्रीकृष्ण केटररला आजच्या प्रकारासाठी जबाबदार मानत कामावरुन दूर करण्यात आलं.

LATEST VIDEOS

LiveTV