नागपूर : मानसिंग शिव यांच्या हत्येचा सहा तासातच उलगडा?

16 Oct 2017 06:00 PM

सुटकेसमध्ये मृतदेह ठेवून पसार झालेल्या प्रकरणाचा काही तासात उलगडा झाला आहे. मानसिंग शिव असं मृत व्यक्तीचं नाव आहे. त्यांची मुलगी आणि जावई गायब आहेत. त्यांनी मानसिंग शिव यांची हत्या केल्याचा संशय आहे.
विशेष म्हणजे नागपूरमधल्या एका दुकानातून त्यांनी सुटकेस खरेदी केल्याचंही उघड झालंय. त्याचं सीसीटीव्ही फुटेजही हाती घेतलंय. कुटुंबातील इतरांचा यात काही संबंध आहे का याचा तपासही पोलीस करत आहेत.
मध्यरात्री नागपूरच्या माटे चौकात एका तरुण-तरुणीनं रिक्षा चालकाजवळ बॅग सोडून पोबारा केला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं प्रकरणाची चौकशी केलीय. आता ही हत्या नेमकी कशामुळे झाली याचा शोध सुरु आहे.

LATEST VIDEOS

LiveTV