पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्याशी बातचित

10 Dec 2017 09:27 PM

91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. गुजरातमधील बडोद्यात होणाऱ्या साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष भूषवतील. लक्ष्मीकांत देशमुख हे विदर्भातील लेखक असून त्यांची आतापर्यंत 13 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

आज रविवारी 10 डिसेंबर रोजी नागपुरात आज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मतमोजणी झाली. या मतमोजणीत लक्ष्मीकांत देशमुख यांना 427 मतं मिळाली,  तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले रविंद्र शोभणे यांना  357 मतं मिळाली.

LATEST VIDEOS

LiveTV