नागपूर : औरंगाबादमधील 'त्या' पीडित मुलीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली

19 Dec 2017 09:45 PM

6 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार होतो, आरोपीला अटक होण्यासाठी दोन महिने लागतात. त्यानंतरही 20 दिवसात आरोपीला जामीन मिळतो. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी तिचे आई-बाबा औरंगाबादहून नागपूरला धावात येतात. आणि त्यानंतरही मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नाही. हा संतापजनक प्रकार आज घडला आहे, नागपूरच्या विधानभवनाबाहेर. प्रशासनानं परवानगी पत्राचा बहाणा करून बलात्कार झालेल्या चिमुकलीच्या वडिलांना मुख्यमंत्र्यांची भेट नाकारली. खुलताबादमध्ये 6 वर्षीय चिमुरडीवर वस्तीतल्याच एका आरोपीनं 28 जूनला अत्याचार केला. मात्र सुस्तावलेल्या पोलिसांना तपासासाठी 2 महिने लागले. तसंच तपासातील अक्षम्य हलगर्जीपणामुळे 20 दिवसातच आरोपीला जामीनही मिळाल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केलाय. विशेष म्हणजे, पीडित मुलीला अजूनही कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. संतापलेल्या कुटुंबियांनी विधीमंडळाबाहेर ठिय्या मांडला. दरम्यान विधीमंडळाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी पीडित कुटुंबियांना गृहराज्यमंत्र्यांची भेट घालून दिली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV