नागपूर : निर्णय चुकला याची उपरती नाना पटोलेंना लवकरच होईल : मुख्यमंत्री

11 Dec 2017 12:06 AM

भाजपचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा देत पक्षाचं सदस्यत्वही सोडलं आहे. मात्र त्यांचा हा निर्णय चुकीचा होता, याची उपरती त्यांना लवकरच होईल, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. शिवाय विविध मुद्द्यांवरुन पत्र लिहिणाऱ्या आमदार आशिष देशमुख यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात चहापानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या सगळ्या आरोपांचा समाचार घेतला.

LATEST VIDEOS

LiveTV