नागपूर : हल्लाबोल करणाऱ्या विरोधकांचे डल्लामार पुरावे आमच्याकडे आहेत : मुख्यमंत्री

10 Dec 2017 09:57 PM

ज्यांनी हल्लाबोल आंदोलन सुरु केलं आहे, त्यांचे डल्लामार पुरावे आपल्याकडे आहेत, असं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्यापासून सुरु होणारं हिवाळी अधिवेशन वादळी असेल याची झलक दिली आहे.

नागपुरात चहापानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या सगळ्या आरोपांचा समाचार घेतला. इतकंच नाही, तर विरोधकांची गाडी ही अजूनही सैराटवरच अडकली असून, त्यातून बाहेर पडण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अनेक मुद्द्यांना हात घातला. सर्व पिकांमध्ये वाढ आहे, कापूस गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत 70.46 लाख होता, तो यावर्षी डिसेंबरच्या सुरुवातीलाच 51.90 लाख क्विंटल आला असल्याचं त्यांनी सांगितलं.

LiveTV