नागपुरात बॅगमध्ये सापडलेल्या मृतदेहाप्रकरणी मुलगी-जावयावर संशय

16 Oct 2017 11:03 AM

नागपुरात सूटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेह प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मृतदेहाची ओळख पटली असून मयत व्यक्तीची मुलगी आणि जावई बेपत्ता आहेत.

मानसिंग शिव असं मयताचं नाव असून ते 40 ते 45 वर्ष वयोगटातील असण्याची शक्यता आहे. मानसिंग यांची मुलगी आणि जावई बेपत्ता असून परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार त्या दोघांनीच ही हत्या केल्याचा दाट संशय आहे. हत्या प्रकरणात कुटुंबातील इतर सदस्यांच्या समावेशाचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे ती सूटकेस काल संध्याकाळीच खरेदी करण्यात आली होती.

LATEST VIDEOS

LiveTV