नागपूर : सुटकेसमध्ये पुरुषाचा मृतदेह, रिक्षाचालकाने हटकल्याने तरुण-तरुणी पसार

16 Oct 2017 08:57 AM

नागपुरात तरुण-तरुणीच्या बॅगमध्ये पुरुषाचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माटे चौकात रात्री 2.30 वाजता हे दोघे एक मोठी बॅग घेऊन जात होते.

या दोघांनी दुर्गानगर स्टॅण्डवर रिक्षा पकडली आणि चालकाला रेल्वे स्टेशनला सोडण्यास सांगितलं. परंतु बॅगचा जडपणा आणि दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने रिक्षाचालकाने त्याबाबत विचारणा केली. यामुळे घाबरल्याने तरुण-तरुणी बॅग तिथेच ठेवून माटे चौकातून पसार झाले.

LATEST VIDEOS

LiveTV