नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या घराजवळील धरमपेठ भागातील घरात मोठी घरफोडी

11 Dec 2017 11:24 PM


मुख्यमंत्र्यांच्या धरमपेठ परिसरातल्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात भरदिवसा घरफोडी करण्यात आलीय. परांजपे यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने चोरीला नेलेत. धक्कादायक बाब म्हणजे हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात पाच हजाराच्या घरात पोलीस तळ ठोकून आहेत. तरी देखील मुख्यमंत्र्यांच्या घरापासून 200 मीटर अंतरावर असलेल्या घरात ही चोरी करण्यात आलीय. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरट्यांना अटक करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.

LATEST VIDEOS

LiveTV