नागपूर : चौकशी सुरु असलेले नेतेही मंत्रिमंडळात : एकनाथ खडसे

20 Dec 2017 06:24 PM

हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सुरु झालेल्या संघाच्या बौद्धिकाला भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे आणि आशिष देशमुखांनी दांडी मारलीये...या दोघांनाही गैरहजर राहिल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची चर्चा आहे मात्र प्रकृती अस्वस्थ्यामुळे आपण बौद्धिकाला हजर नसल्याचं सांगत खडसेंनी नोटीशीचं वृत्त फेटाळलंय..तसंच ज्यांच्या चौकश्या सुरु आहेत, असे मंत्रीही मंत्रिमंडळात आहे..मात्र आपल्याला मंत्रिमंडळात परतण्याची लालसा नाही., अस मतही त्यांनी व्यक्त केलंय...नागपूर अधिवेशनात दरवर्षी संघ मुख्यालयात बौद्धिकाचं आयोजन केलं जातं...मात्र देशमुख आणि खडसेंच्या गैरहजेरीने उलटसुलट चर्चांना उधाण आलंय...काही दिवसांपूर्वी देशमुखांनी मुख्यमंत्र्यांना 7 पानी पत्र लिहीलं होतं...या पत्रात त्यांनी सरकारच्या कामगिरीवर सडकून टीका केली होती....

LATEST VIDEOS

LiveTV