अकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात तफावत, शेतकऱ्यांना गडकरींचा दिलासा

13 Nov 2017 09:00 PM

अकोल्यातल्या महामार्गाच्या भूसंपादनात प्रचंड अनियमितता असल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली... आणि त्याचा इफेक्ट आता दिसू लागला आहे... कारण या बातमीची दखल घेत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन न्याय देण्याचं आश्वासन दिलं आहे.
शनिवारी दुपारी गडकरींनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना थेट चर्चेसाठी नागपूरला बोलावलं... या बैठकीत शेतकऱ्यांनी कैफियत मांडली... राजकीय लागेबांधे असल्या लोकांच्या जमिनीसाठी लाखो रुपयांचा मोबदला... तर सर्वसामान्यांच्या जमिनीला मात्र कवडीमोल भाव दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
त्य़ामुळे आता तरी या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का हेच पहायचंय....

LATEST VIDEOS

LiveTV